शेताची मशागत करण्यासाठी अनगोळ येतील एक शेतकरी गेला असता त्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ४ च्या सुमारास घडली आहे.
बाहुबली बाबुराव भेंडीगेरी (वय ७०) असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.
बाहुबली हे सोमवारी सकाळी १० च्या सुमाराला ट्रॅक्टर घेऊन शेतामध्ये मशागत करण्यासाठी गेले होते. शेतीतील काम आटोपून ते घरी येण्याच्या तयारीत होते.
झाडासमोर गाडी त्यांनी लावली होती. ट्रॅक्टर चालकाला त्यांनी घरी जाण्यास सांगितले व स्वतः झाडासमोर गाडी घेऊन घरी परतणार होते इतक्यात वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कार मंगळवारी सकाळी होणार आहे.
Trending Now