Friday, December 27, 2024

/

सावधान…वीज कडाडताना मोबाईल वर बोलू नका

 belgaum

झाडाखाली थांबलेल्या १८ वर्षीय युवकाच मोबाईल वर संभाषण सुरु असताना वीज पडल्याने सदर युवक जागीच ठार झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील निचीनकी गावात घडली आहे.

Lightening
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार प्रशांत तीप्पानी चालुकी वय १८ वर्षे रा. निचीनकी कित्तूर अशी या घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. निचीनकी डांबरकोप्प रोडवर सोमवारी सायंकाळी पाऊस येताच प्रशांतने झाडाच्या खाली येऊन आडोसा घेतला होता ज्यावेळी तो मोबाईल वर बोलत होता त्याचे वेळी वीज पडून त्याचा जागीच मृत्यु झाला. कित्तूर पोलीस स्थानकाची याची नोंद झाली आहे.
सोशल मिडीयावर ही बातमी पसरताच पाऊस आणि विजेचा गडगडाट सुरु असतेवेळी मोबाईलवर बोलणे जीवावर बेतले अशी चर्चा जोरात सुरु होती पोलिसांनी देखील मोबाईल वर बोलल्यानेच त्याच्या अंगावर वीज कोसळली असल्याची पुष्टी केली आहे. मात्र या बाबत तज्ञाशी बेळगाव live ने संपर्क केला असता मोबाईल फोन चमकणाऱ्या विजेला आकर्षित करत नाही असा निर्वाळा दिला. लोक चुकीच्या जागी थांबल्याने वीज कोसळू शकते असा अंदाज देखील त्यांनी मांडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.