विविध समस्यांत हेस्कॉम अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नगरसेवकांनी पालिका बैठकीत हेस्कॉम अधिकाऱ्यांना धारेवर धरले.सोमवारी सकाळी पालिका सभागृहात अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळो महापौर बसप्पा चिखलदिनी,उपमहापौर मधूश्री पुजारी, विरोधी गट नेते दीपक जमखंडी, सत्ताधारी गटनेते पंढरी परब,पालिका आयुक्त स्थायी समितीच्यांचे अध्यक्ष आदी यावेळी उपस्थित होते.
पावसाळ्या अगोदर हेस्कॉम भूमिगत केबल वाहिन्यासाठी रस्त्यांची खुदाई करून दुर्दशा केली आहे त्याचा अहवाल नगरसेवक किरण सायनाक आणि रमेश सोंटक्की यांनी मागितला असता हेस्कॉम अधिकारी अप्पन्नावर यांना उत्तर देता आले नाही त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधी भूमिगत केबल साठी खुदाई केलेला रस्ता हेस्कोम कडून दुरुस्त करून घेण्याचा निर्णय झाला.शहरात खुदाईत किती रस्ता नादुरुस्त आहे याची पालिकेच्या वतीनं मंगळवारी पहाणी केली जाणार आहे त्या नंतर हेस्कोम कडून पावसाळ्या आधी दुरुस्त करून घेतला जाणार आहे.
वारंवार होणारी बिजली गुल आणि शहरात किती हायमास्ट चालू आहेत किती बंद आहेत याचा अहवाल मागितला असता अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली जे काम पूर्वी एक अधिकारी करत होता तेच काम पाच अधिकारी मिळून करत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला यावेळी देखील अधिकारी निरुत्तर होते.
बुडाच्या 28 प्लॉट लिलाव उध्या नोटिफिकेशन
पालिकेचे जे माळ मारुती येथील 28 प्लॉट लिलाव करण्याचा निर्णय सर्वसाधारण बैठकीत झाला आहे ते काम त्वरित करून उध्याच लिलाव नोटिफिकेशन काढा अशी मागणी देखील करण्यात आली .ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधा पालिकेने केली आहे त्यात सुधारणा करून कर वाढविण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेत सुधारणा करण्या विषयी देखील बैठकीत चर्चा झाली.