मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी सत्तेवर येताच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणाबाजी केली होती, ही घोषणा पूर्ण न केल्याचा ठपका ठेऊन आज भाजपने राज्यात बंद ची हाक दिली व ठिकठिकाणी निदर्शने केली.या बंदला बेळगावात कमी प्रतिसाद मिळाला.
बेळगाव परिसरात सर्व शाळा कॉलेज बाजारपेठ दुकानं सगळे व्यवहार दिवसभर सुरू राहिले शहरात कुठेही बंद चे परिणाम दिसले नाहीत.
स्थानिक भाजप नेत्यांनी निदर्शने करून आपला रोष व्यक्त केला. कित्तुर चन्नम्मा चौकात आमदार अनिल बेनके व अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.