भाजी विक्रेत्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ६९.७९ कोटी खर्चून ही बाजारपेठ उभारण्यात आली आहे.मात्र काही अज्ञाताकडून येथील पंखे व लाइटची चोरी करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे पोलिसांकडुन या प्रकाराकडे गंभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे १३.६५ एकर जागेत हे भाजी मार्केट उभारण्यात आले आहे.
दोन वर्षानंतरही याचा मुहूर्ताचा नारळ फुटला नाही.आता नारळ फुटला असला तरी येथील गाळे रिकामी पडून असल्यामुळे येथे चोरीचे प्रकार घडत आहेत. मात्र याकडे लक्ष देण्यास समितीनेही डोळेझाक केल्यानेच दिसून येत आहे.
या भाजीमार्केटमध्ये ए, बी, सी, डी आणि इ असे पाच ब्लॉक आहेत.यामध्ये १८४ गाळे आहेत. यामधील अनेक गाळ्यामध्ये चोरीचे प्रकार घडल्याचे दिसून आले आहे,
हे भाजी मार्केट उभारणीसाठी १० कोटी रुपये कर्ज घेण्यात आले आहे, त्यासाठी गाळे भाडेतत्वावर देण्याचा निर्णय ही झाला , मात्र गाळे न गेल्यामुळे गाळे तसेच पडून आहेत, त्यामुळे येथे चोरीचे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे, याकडे दुर्लक्ष होत असून याची दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे,