बेळगाव संगीत कलाकार संघ आयोजित करण्यात आलेल्या शास्त्रीय गायनाच्या मासिक बैठक कार्यक्रमात श्रीमती सीमा कुलकर्णी आणि रोहिणी कुलकर्णी यांनी आपली कला सादर केली रविवार दि 27मे रोजी च्या बैठकीत सीमा यांनी राग देसी व कबीर भजन सादर केली त्यांना तबला साथ चिदंबर तोरवी आणि हार्मो साथ वामन वागूकर यांची होती.
रोहिणी कुलकर्णी यांनी राग शुद्ध सारंग मधे सुंदर कांचन बरन हा बडा ख्याल आणि सखी मोहें ना समझत, ही छोटा ख्याल बंदिश आणि गाइये सजनी गुनीजन बीच हा चतुरंग सादर केला. त्या नंतर धानी रागात मध्यलय त्रिताल मधे ऐसा तू मोरा सैय्या आणि मानत नाही लंगरवा धीट ही द्रुत बंदिश सादर केली त्यानंतर यती नारायण सरस्वती रचित स्वयं संगीत दिलेले1 पद आणि का रे ऐसी माया ही भैरवी गाऊन मैफलिची सांगता केली. सारंग कुलकर्णी संवादिनी आणि तोरवी यांनी तबला साथ तर कु सुलक्षणा मल्ल्या, तंमयी सराफ, रचना कुलकर्णी यांनी समर्पक गायन साथ केली.