जमखंडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार (जिल्हा बागलकोट) सिद्धू न्यामगौडा यांचे तुळशीगेरी बागलकोट जवळ सोमवारी पहाटे अपघाती निधन झाले आहे. दिल्लीहून गोव्याला विमानाने आल्यावर इनोव्हातुन बागलकोटकडे जातेवेळी इनोव्हाचा टायर फुटल्याने गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात न्यामगौडा यांच निधन झाले आहे.
दुसऱ्यांदा जमखंडी मतदार संघातूनते काँग्रेसचे आमदार झाले होते यापूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्री पद,विधान परिषद सदस्य म्हणून कार्य केले होते. जमखंडी तालुक्यातील कडकोळ गावचे ते निवासी होते बागलकोट जिल्ह्यातील लिंगायत गाणगेर समाजाचे मोठे नेते होते.दिल्लीहुन बागलकोट कडे परतेवेळी हा अपघात झाला आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुली दोन मुलं असा परिवार असून त्यांची एक मुलगी अमेरिकेत वास्तव्यास आहे.त्यांचं पार्थिव बागलकोट पोलो मैदानात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे.सिंगापूर अमेरिकेतुन त्यांची मुलगी, दिल्ली बंगळुरुतून राजकीय मित्र आल्यावर मंगळवारी सकाळी दहा च्या सुमारास अंतिम संस्कार केला जाणार आहे.
न्यामगौडा यांच्या निधनाने विधानसभेत काँग्रेसची सदस्य संख्या 78 वरून 77 झाली आहे.