संपूर्ण समाजाचे आरोग्य हे स्त्रीच्या आरोग्यावर अवलंबून असते असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. स्त्री व्यवस्थित निरोगी असेल तर तिला होणारी मुलंसुध्दा निरोागी सशक्त व निरोगी होती. मुलं ही उद्याची संपत्ती असल्यामुळे निरोगी असणे हे कुटूंबाच्या व समाजाच्या दृष्टीने अतिशय जरूरीचे आहे.
गर्भवती स्त्रियांच्या आरोग्यावरच त्यांना होणार्या मुलांचे आरोग्य अवलंबून असते. याकरिता सगर्भावस्थेत स्त्रियांची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांना सर्व आरोग्य सुविधा आणि मार्गदर्शन योग्यवेळी मिळण्याची व्यवस्था झाली पाहिजे. एकंदर नऊ महिन्याच्या सगर्भावस्थेचा काळ हा तीन महिन्यांच्या तीन विभागांमध्ये विभागलेला आहे.
पहिली ट्रायमेस्टर-
अर्थात पहिले ती महिने- या कालावधीत वारंवार उलटीची भावना होत असते. सकाळी उठल्यावर मळमळणे, चक्कर येणे असे त्रास होतात. काही स्त्रियांना प्रमाणाबाहेार उलट्या होणे, उलटीतून रक्त पडणे, असे प्रकार होतात. शौचास अजिबात साफ होत नाही. क्वचित मूळव्याधीचा त्रास होतो. अशावेळी सकाळी उठल्या उठल्या चहा कॉफी घेऊ नये. आवळ्याचा मोरावळा घ्यावा. त्यानंतर अर्ध्यातासाने कोरडे बिस्किट खावे. पाणे प्यावे आणि मगच चहा, दूध, किंवा कॉफी प्यावी. या तीन महिन्यातच स्त्रियांना डोहाळे लागतात. काही विशिष्ट पदार्थ खाण्याची अनिवार इच्छा होते. माफक प्रमाणात असे पदार्थ खावेत. शौचास स्वच्छ होण्यासाठी औषधे घेण्यापेक्षा तंतूमय पदार्थ (उदा. पालेभाज्या, कोंड्यासकट चपाती, भाकरी, फळं, सालीसकट डाळी) यांचा समावेश आहारात असावा. पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये शक्यतो शारीरिक संबंध ठेऊ नयेत.
होमिओपॅथी-
गरोदरपणामध्ये, प्रसूतीसाठी व प्रसूतीपश्चात उपचारासाठी सर्वच उपचारपध्दतीमध्ये होमिओपॅथभ अगदी सुरक्षित व साईड इफेक्टरहित आहे. पहिल्या तीन महिन्यात होणार्या उलटी व डोहाळ्यांच्या त्रासासाठी इपेकॅक, असाफिटीडा, कोलोसिंथ अशी औषधे उपलब्ध आहेत. मलावरोध बध्दकोष्ठतेसाठी रोबेनिया, सिलिशिया, अल्युमिना अशी औषधे वापरता येतात. अशक्तपणासाठी अल्फाल्फा, निसेंग अशी पोषक औषधे देखील उपलब्ध आहेत. मूळव्याधीसाठी कोलीनसोनिया, रटानिया, एस्क्युलस अशी औषधे द्यावी लागतात. आहार आणि विश्रांती यावर भर दिला जावा. गर्भपाताची संभावना असल्यास सबिना, अलेट्रिस, सेपिया अशी औषधे वापरावी लागतात.
दुसरी ट्रायमेस्टर-
चौथ्या महिन्यापासून ते सहाव्या महिन्यापर्यंत बाळाचे सर्व अवयव जोताने वाढू लागतात. पाचव्या महिन्यापासून बाळ हलू लागते. आईला उलटी होण्याचे, शौचाचे त्रास कमी जाणवू लागातात. चौथ्या महिन्यात रक्त तपासणी व सोनोग्राफी करणे आवश्यक असते. या काळात अतिरिक्त कॅल्शियम व लोह तसेच रक्तवाढीसाठी पोषक औषधे घेणे आवश्यक असते. माफक व्यायाम, हलकं घरकाम, व्यवस्थित झोप व मानसिक स्वस्थता याची या काळात आवश्यकता असते. या काळात कंबरदुखी, पायात मुंग्या येणे, क्वचित स्त्री कुपोषित असेल, मानसिक दडपणाखाली असेल तर रक्तदाब वाढून टाक्झेमिया फिटस येणे, अंगावर सूज चढणेअसे प्रकार सहाव्या महिन्याच्या सुरूवातीला जाणूव शकतात. त्यावेळी प्रथिनयुक्त पोषक आहार, काही खास औषधे घेणे अपरिहार्य असते. विश्रांती व मानसिक स्वस्थता आवश्यक असते.
होमिओपॅथी-
पायावर सूज येणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता यावर उत्कृष्ट होमिओपॅथिक औषधे उपलब्ध आहेत. उदा. कॅक्टस, डिजीटॅलीस, पॅसीफ्लोरा, कॅल्केरियाफॉस, कालिफॉस अशी बायोकेमिक औषधे, होमिओपॅथीक औषधे उपयुक्त आहेत. ही औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतल्यास अचूक लागू पडतात. काही स्त्रियांना या काळात व्हेरिकोाज व्हेनस म्हणजे पायाच्या शिरा फुगण्याचासुध्दा त्रास होतो. त्यावरही होमिओपॅथीक उपचार उपलब्ध आहेत.
तिसरी ट्रायमेस्टर-
सहा महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंतचा काळ हा अवघडलेला असतो. हालचाली मर्यादित होतात. पोटाच्या भारामुळे कमरेवर ताण येतो. श्वास घेण्यास त्रास होतो. काही स्त्रियांना गरोदरपणात थॉयराईड व डायबिटीस यासारखेही विकार होतात. त्यासाठी सखोल रक्त, लघवी तपासणी आवश्यक असते. अन्यथा बाळावर त्याचे वाईट परिणाम होतात. पोषके घेणे, टिटॅनसची इंजेक्शन्स घेणे आवश्यक असते. मानसिक, शारीरिक धक्के टाळावेत. वेळेआधी (प्रिमॅच्युअर) प्रसूती होण्याची, बाळ कमी वजनाचे असण्याची शक्यता वाढते. त्यासाठी सोनोग्राफी आवश्यक असते. बाळाची वाढ खुंटणे, बाळाच्या भोवतीचे पाणी कमी होणे, असे प्रकार होऊ शकतात. होमिओपॅथी-
कंबरदुखी, बध्दकोष्ठ यावर तर उपचार आहेतच शिवाय सुलभ व नॉर्मल प्रसूतीसाठी एक विशिष्ट औषधांचा फॉर्म्युला मिळतो तो ही होमिओपॅथिक व बायोकेमिक औषधांचा. त्यामुळे नॉर्मल प्रसूती होणे शक्य असते. पोटातले बाळाभोवतीचे पाणी वाढण्यासाठीदेखील काही विशिष्ट औषधे आहेत. अर्थात सर्व औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत.
पूर्ण गरोदरपणात स्त्रीचे वजन कमीत कमी 11 किलोने वाढणे आवश्यक असते. प्रसूतीपश्चात बाळास स्तनपान योग्या होण्यासाठी स्तनाग्रांची काळजी घेणे आवश्यक आहार, विश्रांती, झोप व पोषक औषधे घेणे अतिशय जरूरीचे असते. होमिओपॅथी व मॉडर्न मेडिसिन यांच्या सहाय्याने सगर्भावस्था व प्रसूती सुयोग्य पार पडू शकते.
संपर्क
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक – ९९१६१०६८९६
सरनोबत क्लिनिक- ९९६४९४६९१८