रविवार आहे म्हणून घरी बसून वेळ घालवण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांना एक पूर्वसूचना आहे. उद्या दि २७ रोजी शहराच्या काही भागात वीज गुल होणार आहे. हेस्कॉमने शहराच्या मध्यवर्ती भागात दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने हा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
गोंधळी गल्ली, सरदार मैदान, सिटी पोलीस लाइन, गांधी भवन परिसरात विद्युत पुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
याची नोंद नागरिकांनी घेऊन आपली सुट्टी वाया जाणार नाही यासाठी आधीच नियोजन केलेले बरे.
Trending Now