राज्यात नवीन सरकारचे आगमन झाले आहे. काल बहुमत सिद्ध झाल्यानंतर आजपासून सॅटेलाईट कार्यक्रमांवर विशेष भर देण्यास सुरुवात झाली आहे. तसे आदेश सर्व सरकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत.
हे कार्यक्रम विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत थंडावले होते. आता निवडणुका संपल्या आणि नवीन सरकार स्थापन झाले आहे . त्यामुळे राज्य सरकारने सर्व तालुका पंचायतीच्या अधिकाऱ्यांना सॅतेलाइटद्वारे नवीन संकल्प आणि नवीन योजनांची माहिती देणास सुरुवात केली आहे.
नवीन सरकारची ध्येय धोरणे याची माहिती सॅटेलाइटद्वारे देण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे रखडलेल्या विकास कामाबरोबरच या पुढील काळात कोणती कामे हाती घ्यावीत याबाबतही सूचना करण्यात येणार आहे. दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे.