महात्मा गांधी उद्योग खात्री योजनेत बेळगाव जिल्हा पुन्हा प्रथम आला आहे.
२०१७-१८ सलात १८७४९८इतके रोजगारांनी काम केले आहे.त्यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जिल्ह्यात ३०० कोटीहून अधीक कामे करण्यात आली आहेत. गरिबांना रोजगार मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सकस कामाबरोबरच बेरोजगारांना मदत मिळावी हा हेतू ठेऊन या कामाना चालना देण्यात येत आहे. २०१६-१७ सालीही बेळगाव ने प्रथम क्रमांक पटकाविला आहे, यासालीही बेळगावने आपले स्थान अबाधित ठेवले आहे.
राज्यात एकूण ४७६१०४३ रोजगारांनी काम केले आहे , तलावांची दुरुस्ती , नाले खोदाई, झाडे लावणे आदी कामे करण्यात आली आहेत. ही योजना ग्राम पंचायत मार्फत राबविण्यात येते. ग्राम पंचायत बरोबरच फलोत्पादन खाते, वन खात्यांचाही यात समावेश आहे , पुढील वर्षीही प्रथम क्रमांकाचे स्थान अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत.