गर्भपात करायचाच नाही अश्या कायद्याने सविता हालपन्नावर सारख्या अनेक महिलांचा मृत्यू होत असल्याने आयरलंड सरकारने काल जनमत चाचणी झाली. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या या चाचणीचा निकाल आज दुपारी लागेल. गर्भपात ला हो की नाही याचा फैसला आज होईल, त्यानुसार कायदे बदल होणार आहे.
काल सकाळी सात पासूनच मतदानास सुरुवात झाली होती. रात्री १० पर्यंत मतदान झाले.डब्लिन येथे सकाळी ६ पासूनच लोक जमले होते. शहरी भागात गर्भपाताच्या बाजूने आणि बिगर शहरी भागात विरोधात मतदान झाले आहे. लोकांनी आपले प्रवास रद्द करून मतदान केले आहे.
Trending Now