नुकताच बंगळुरूचे आर्च बिशप या उच्च पदावर नियुक्त झालेले आणि गेल्या 12 वर्षा पासून बेळगावचे बिशप म्हणून सेवा बजावत असलेल्या रेव्ह.डॉ पीटर माचाडो यांना निरोप देण्यात आला.शुक्रवारी फातिमा कॅथेड्रल मध्ये झालेल्या हृदय स्पर्शी कार्यक्रमा द्वारे त्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी लुसीओ मस्कारहेंस ख्रिश्चन धर्मगुरू,नन आणि शहरातील महनीय व्यक्तींनी सहभाग नोंदवला होता.बिशप पीटर माचाडो यानीच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले होते.डायॉसिस च्या वतीनं बासिल डिसोझा यांनी मानचिन्ह देऊन पीटर माचाडो यांचा सत्कार केला. रेव्ह.फादर लुसीओ मस्कारहेंस, क्लारा फर्नांडिस, फादर प्रशांत सिक्वेरिया,रेव्ह.विजय प्रकाशआदींनी
पीटर माचाडो यांच्या कार्याचा गौरवोदगार केला.ऑल कर्नाटक युनायटेड ख्रिश्चन फोरम, युनायटेड ख्रिश्चन फोरम सह आदी संघटनांनी माचाडो यांना पुढील आर्च बिशप च्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना डॉ पीटर माचाडो यांनी आपल्या आयुष्यात बेळगावातील जनतेची सेवा करण्याचे सौभाग्य मिळाले याबद्दल देवा कडे कृतज्ञता व्यक्त करत आता पुढील आयुष्यात आर्च बिशप म्हणून बंगळुरू च्या जनतेची सेवा करण्याचे संधी मिळणार असून जबाबदाऱ्या वाढल्या असल्याचे ते म्हणाले.
माचाडो यांनी संत मदर तेरेसा यांच्या नावाचा चौक किंवा कोणत्याही रस्त्याला नाव देण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन कार्यक्रमात उपस्थित नागरी आणि धार्मिक लोकांना केलं. बिशपांच्या जीवनावर आधारित नृत्य लहान मुलांनी सादर केला.डी सी पी सीमा लाटकर,कॅटोंमेंट उपाध्यक्ष साजिद शेख, माजी उपाध्यक्ष राहिला शेख यांची देखील उपस्थिती होती.