सध्या सर्व कामे ऑनलाईन वर सुरू आहेत. मार्केटिंग घर बसल्या ऑनलाईन करण्याचा ट्रेंड रुजत आहे. या बदलत्या ट्रेंड मध्ये बेळगावच्या युवा उद्योजकांनी अप मार्केट स्टोअर या नावाने एक ऑनलाईन मार्केट प्लेस तयार केली आहे.
पूर्वा सरनोबत आणि सुदर्शन हुंसवाडकर अशी त्यांची नावे आहेत.त्यांच्या या स्टोअर मध्ये स्त्री आणि पुरुषांचे कपडे, स्टायलिश मटेरिअल्स, दागिने, सेंद्रिय उत्पादने आणि हँड क्राफ्ट चा समावेश असणार आहे. माफक दरामध्ये हे प्रॉडक्ट मिळणार आहेत.
पूर्वा या २९ वर्षीय असून सेंट जोसेफ शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत तर एक गृहिणी आणि दोन मुलांची माताही आहेत. सुदर्शन हे ३२ वर्षीय असून सेंट पॉल्स चे माजी विद्यार्थी आहेत. चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी व्यवसायात उडी घेतली आहे.