गेल्या काही वर्षांत काँग्रेस पक्ष बांधणीत दिलेले योगदान ध्यानात घ्या एक लाखाहून अधिक मतदान ग्रामीण मतदार संघात मिळवून नवीन इतिहास करणाऱ्या अक्का उर्फ लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्री करा अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरातील कित्तुर चननमा चौकात हेब्बाळकर समर्थकांनी घोषणाबाजी करत काँग्रेस जे डी एस संमिश्र सरकार मध्ये लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्री मंडळात स्थान ध्या अशी मागणी करत आंदोलन केले.
गेल्या दोन दशकात लक्ष्मीताई यांच पक्षासाठी अतुलनीय योगदान आहे बेळगाव शहरातील ऐतिहासिक काँग्रेस कार्यालय देखील हेब्बाळकर यांच्याच प्रयत्नातून साकार होत आहे महिला कोट्यातून त्यांना मंत्री करा अशी मागणी आक्का समर्थकांनी केली आहे.
युवराज कदम,शंकर गौडा पाटील, अडीवेश इटगी राजा सलीम काशीमनांवर यांनी मागणी केली आहे.
शुक्रवारी कर्नाटक विधान सभेत विश्वास दर्शक ठराव पार करत कुमार स्वामी सरकारने आवाजी बहुमत सिद्ध केलं आहे आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यात बेळगावं जिल्ह्यातून दोघांना मंत्री पदे मिळणार आहे त्यात एक मंत्री हेब्बाळकर यांना देण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.