बेळगाव रेल्वे स्थानकावरील गुड्स शेड(गोडाऊन) शहरातून सांबरा रेल्वे स्थानकावर स्थलांतर केले जाणार आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हे गोदाम हलवणार असल्याची संकेत दिले आहेत. सांबरा रेल्वे स्थानकाच्या रिजर्व्ह जागेत नवीन गुड्स शेड उभारणार असल्याची माहिती मिळत आहे.
(फोटो सौजन्य-aab)
बेळगाव शहरात असणारी रहदारीची समस्या वारंवार होणारे जॅम फिरणाऱ्या मालवाहू ट्रक मुळे होणारी कोंडी लक्षात घेता अनेक दिवसा पासून हे गोदाम स्थलांतरीत करा अशी मागणी केली जात होती याची दखल रेल्वे प्रशासनाने घेत सदर गुड्स शेड हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.
या गोदामाच्या स्थलांतरामुळे आता रेल्वे प्रवास करणाऱ्या दक्षिण भागातील बेळगावकरांसाठी एक नवा प्रवेशद्वार उपलब्ध होणार असून वाहतूक व पार्किंग व्यवस्था सुलभ होणार आहे.
त्यामुळे पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामाला बेळगावातून चालना मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळ अगोदरच मंजुरी दिलेली आहे. एकूण ४६७ किलोमीटरच्या या रेल्वेमार्गावर अजून एक ट्रॅक बसविण्यात येणार असून, त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रासह, कर्नाटक, गोवा या राज्यांतील प्रवाशांना होणार आहे.