इफ्फा हॉटेल क्लब रोड समोरील ह्युम पार्क येथे १९ मे पासून आंबा महोत्सव सुरू झालाय. दि २७ मे पर्यंत तो चालणार आहे. या महोत्सवात १०० प्रकारचे आंबे पाहण्याची संधी मिळत आहे.
ऑम्लेट, टॉमी, मल्लिका, मणी, माऊ, लाडू ही आहेत आंब्यांची नावे, फलोत्पादन खात्याने हा महोत्सव आयोजित केला आहे.१८ स्टॉल मधून शेतकरी हे आंबे थेट ग्राहकांना विकू शकत आहेत.
हापूस, केसर, पेडा, रसेल, वनराज, मानकुर, जहांगीर, तोतापुरी, लाल मुनी, मनी माऊ, चिक्की मुखी, लिची, निलेशन, चित्रा पायरी, खादर, सुमन रेखा, मालगोवा अशी या आंब्यांची नावे आहेत.