कर्नाटकमध्ये भाजपचं बेगडी राष्ट्रप्रेम पहायला मिळालं, सरकार पडल्यानं निराश झालेल्या भाजप आमदारांनी राष्ट्रगीताआधीच काढता पाय घेतला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याप्रकरणी भाजपवर टीकेची झोड उठवली.
बहुमतचा आकडा गाठण्यात अपयश आल्यानं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीआधीच आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेस आणि जेडीएसवर हल्ला चढवला.
दरम्यान, राष्ट्रगीताआधीच भाजप आमदारांनी काढता पाय घेतल्यानं भाजपला मोठ्या टीकेचा सामना करावा लागू शकतो.