विश्वास मत सिद्ध करू न शकल्याने पुन्हा एकदा बी एस येडियुराप्पा यांनी राजीनाम दिला आहे त्यामुळे केवळ दीड दिवसाचे मुख्यमंत्री ते बनले आहेत. या अगोदर २००७ मध्ये सात दिवसाचे २००९ मध्ये ३९ महिने मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यावर २०१८ केवळ तीन दिवसाची अल्पवधीची कारकीर्द ठरली आहे.
शनिवारी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार येडियुराप्पा यांना सायंकाळी चार वाजता विश्वास ठराव संमत करून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते त्या नुसार हंगामी स्पीकर के जी बोपय्या यांनी २२१ आमदारांना शपथ देवविली.शुक्रवारी सर्वोच्य न्यायालयाने मुख्यमंत्र्यांचं अधिकार कमी करुन बहुमत सिद्ध करा असा आदेश दिला होता.
दरम्यान शनिवारी बंगळूरू फिंच हॉटेल मध्ये बेळ्ळारीचे आमदार आनंद सिंह आणि प्रताप गौडा यांना बंदोबस्तात आणण्यात आले.कॉंग्रेस कडून भाजपा वर येडीयुरापा आणि श्री रामलू आणि इतर भाजप नेत्यांना आमदार खरेदी साठी ऑफर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता शेवटी बहुमत सिद्ध होणार नसल्याने मुख्यमंत्री बी एस येडियुराप्पा यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या तिसऱ्या टर्मचा राजीमाना दिला.
राजीनाम देत त्यांनी सभागृहाला संबोधन केल मोदी आणि अमित शाह यांनी माझ्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली लोकांनी निवडणुकीत काँग्रेसचा तिरस्कार केला आहे.आम्ही 40 वरून 104 वर पोचलो .सिद्धरामय्या यांनी कुमार स्वामींना मुख्यमंत्री करणार नाही अशी खोटी शपथ घेतली होती. भावुक होऊन सभागृहाला केलं संबोधन..अन दिला राजीनामा.. बहुमत म्हणजे माझ्या जीवनातील अग्नी परीक्षा होती राज्यातील जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. आगामी लोक सभेत 28 पैकी 28 जागा जिंकू असा विश्वास व्यक्त करत राज्याला मॉडेल स्टेट बनवू .राज्यातील जनतेला नमन करत मी जनादेश मान्य करतो जीवनभर कर्नाटकसाठी लढत राहणार 113 जागा जिंकल्या असत्या तर वेगळी गोष्ट असती.