कर्नाटक विधानसभेत सदस्यांचा शपथविधी झाल्यावर विधीमंडळाचे कामकाज साडेतीनपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. कॉंग्रेस आणि जनता दलाच्या सदस्यांच्यामधील एकी न तुटल्याने व बहुमत सिद्ध करण्यासाठी कुठलाही अन्य उपाय यशस्वी न झाल्याने भाजपच्या गोटात प्रचंड निराशा पसरली आहे. येडीयुराप्पा आणि भाजप नेत्यांची बैठक नुकतीच सुरू झाली असून यावर चर्चा सुरू झाली असून बहुतेक येडीयुराप्पा आपल्या पदाचा राजीनामा देईल अशी शक्यता आहे.
यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी तेरा दिवसांचे सरकार चालवले आणि विश्वासप्रस्ताव सादर होण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. भाजपच्या गोटातून त्याच घटनेचा दाखला दिला जात असून येडीयुराप्पा राजीनामा देतील असे सांगितले जात आहे. मॅजिक फिगर गाठण्यासाठी अगदी अल्प वेळ मिळाल्यामुळे भाजपच्या साहसवादी राजकारणाला धक्का बसला आहे.