भाजप चे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांना मॅजिक नंबर १११ ची पूर्तता करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या २२२ जागा निवडून आल्या असल्या तरी त्यापैकी एच डी कुमारस्वामी यांनीच दोन जागांवर यश मिळवले असल्याने जी काही करामत करायची ती २२१ आमदारांच्या जीवावर करावी लागेल. काँग्रेस आणि जेडीएस मधील आमदारांवर ऑपरेशन कमळ करून जादू करता येईल का हे येडीयुरप्पाना आज संध्याकाळ पर्यंत दाखवून द्यावे लागेल.
बी एस येडीयुरप्पा यांना १११ आमदार आणून बहुमत सिद्ध करायचे आहे. कर्नाटकाच्या विधानसभेत २२४ जागा आहेत. त्यापैकी २२२ जागांसाठी निवडणूक झाली आहे. कुमारस्वामी चनपट्टण व रामनगर अशा दोन ठिकाणी निवडून आल्याने प्रत्यक्ष सदस्य संख्या २२१ आहे. यापैकी भाजपने १०४ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसने ७८, जेडीएस ३६, बीएसपी १ तर इतर अपक्ष २ असे गणित आहे.
काँग्रेस आणि जेडीएस ची एकत्रित संख्या ११४ असून बीएसपीचा एक व इतर दोन अपक्ष असे तिघे या युतीला पाठींबा देऊ शकतात.
भाजपला सात जणांची कमतरता जाणवत आहे, दुसऱ्या युतीकडे एकत्रित संख्याबळ आहे पण भाजप आपली कसोटी पूर्ण करून दाखवेतोवर त्यांना संधी नाही.
काय काय घडू शकते?
१.आज सकाळी सर्व पक्ष आपापल्या आमदारांची बैठक घेऊन त्यांना व्हीप देऊ शकतात.
२.काँग्रेस जेडीएस युतीतील सातजण भाजपला क्रॉस व्होटिंग करू शकतात.
३.भाजप आपल्याच पक्षातील १४ जणांना गैरहजर ठेऊन विधानसभेचे एकूण संख्याबळ २०७ करवू शकतो व १०४ जणांचे बहुमत सिद्ध करता येऊ शकते.
अशा अनेक तांत्रिक मुद्यांची कसोटी आज बेंगळूरच्या विधानसभेत लागेल.