गेल्या कांही वर्षापासुन आंदोलनांनी पेटलेल्या म्हादई नदीच्या पाणीप्रश्नी आता गोवा सरकारकडुन चर्चेसाठी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि भाजपाचे कर्नाटक प्रभारी प्रकाश जावडेकर यांना बोलावणी आली आहे. यामुळे आता मुख्य चर्चेला महत्व आले आहे. अशी माहिती सध्या उपलब्ध होत आहे.
कर्नाटकात भाजपाचे येडीयुराप्पा यांनी मुख्यमंत्री म्हणुन शपथबध्द झाल्यानंतर आज गोवा सरकारकडुन भाजपाच्याच नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रीत केल्याने ही भाजपाची खेळी असल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसांत या चर्चेसाठी बोलावणी आल्याची माहिती सध्या उपलब्ध होत आहे. जगदीश शेट्टर यांना फोनद्वारे हे आमंत्रण दिले आहे.
कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकाला पाणी सोडणार नाही ही गोवा सरकारची भूमिका आजवर आहे. आता दोन्हीकडे भाजप आल्याने या भूमिकेत बदल होऊ शकतो पण त्यातून नुकसानकारक काही घडू नये हे पाहावे लागेल.