अखेर १९ मे रोजी होणाऱ्या शिवजयंती चित्ररथ मिरवणूकीला परवानगी पोलीस प्रशासनाने दिली. जो कोणी कायदा हातात घेईल त्या मंडळाच्या चित्ररथावर राहणाऱ्या जबाबदार कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिली आहे .
बेळगावची परिस्थिती अशांत करणाऱ्याची गय केली जाणार नाही, जयंती उत्सवाच्या मिरवणुकीला गालबोट लावणाऱ्यावर प्रशासन बारीक नजर ठेवून आहे. असा इशाराही पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी दिला आहे.
बेळगावातील ऐतिहासिक शिवजयंती मिरवणूक १९ रोजीच काढण्याचा निर्णय मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला होता.
दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. निवडणूक आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आलेली मिरवणूक आता शनिवारी घेण्याचा निर्णय झाला.
शिवजयंती शांततेने साजरी करून मिरवणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता मिरवणूक ठरलेल्या तारखेप्रमाणे काढून बेळगाव शहराची परंपरा जपण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यानुसार परवानगी घेण्यासाठी आज मध्यवर्तीचे पदाधिकारी व मंडळांचे कार्यकर्ते गेले होते.
श्री शिवजयंती ही बेळगावची भूषण आहे.ती दरवर्षी ठराविक दिवशीच साजरी केली जाते… निवडणूकीची आचार संहिता म्हणून ती हिंदुस्थानात नंतर साजरी करणे चुकीचे आहे.आचार संहिता श्री आंबेडकर जयंतीला मग का लागू नाही.. पण श्री आंबेडकर जयंती ठराविक दिवशीच साजरी झाली हे उत्तम. यावर जरूर विचार व्हावा.