माजी महापौर विजय मोरे यांच्यातर्फे चालविल्या जात असलेल्या शांताई विद्या आधार उपक्रमास जायंट्स ग्रुप बेलगाम सहेली तर्फे रद्दीची मदत देण्यात आली आहे.
विद्या आधार तर्फे रद्दी विकून विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजची फी दिली जाते. आता शाळेला सुरुवात होणार असून यंदा ३०० हुन जास्त विद्याथ्यांना मदत करण्याचा उद्देश आहे. रद्दी देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी ९८४४२६८६८७ या क्रमांकावर संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली आहे.