*“विनासायास वजन कमी करा – मधुमेह टाळा .”*
– डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान.
मंगळवार दी. २२ मे २०१८ रोजी संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत जिरगे हॉल JNMC KLE येथे औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयातील व्याख्याते आणि ‘स्थूलत्व व मधुमेहमुक्त भारत’ या अभियानाचे प्रसारक डॉ. जगन्नाथ दीक्षित हे विनासायास वजन कमी करण्यास व मधुमेह टाळण्यास उपयुक्त भारतीय आहार या बद्दल मार्गदर्शन करतील.
लठ्ठपणा, मधुमेह, उच्चरक्तदाब, दम,हृदयविकाराचा झटका, थायरोईड, सांधेझिजणे तसेच मेंदूचा अपस्मार अशा अनेक रोगांचे भारत देश हा आगर बनला आहे.
लठ्ठपणा हा स्वत: एक आजारच आहे आणि त्याच्यामुळे इतर रोग होण्याची जोखीम वाढते.
इन्सुलिन हे संप्रेरक आपल्याला लठ्ठ बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते, कर्बोदके व कॅलरिज असलेले वारंवार खाण्यामुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढलेली राहते,या वाढलेल्या इन्सुलिनचे दुष्परिणाम म्हणजेच वर वर्णन केलेले रोग होत.
सध्या लठ्ठपणा कमी करणे हा अनेकांचा व्यवसाय बनला आहे. महागडी उपकरणे किंवा विशिष्ट अशा आहारासाठी अत्यंत दबावाखालि जगतात. दुर्दैवानेहजारो रुपये खर्च करूनही लोकांच्या पदरी निराशाच येते. लठ्ठ लोक हताश – निराश होतात.. जे लठ्ठपणाचे परत एक कारण असू शकते.
रक्तातील इन्सुलिनची पातळी कमी करणारा हा उपाय लठ्ठपणाबरोबरचब मधुमेहाच्या प्रतिबंधासाठीही उपयुक्त ठरेल.
सार्वजनिक आरोग्याच्यादृष्टीने national health improvement म्हणून मधुमेह व स्थूलता मुक्त भारत स्वप्नपुर्ति साठी हा उपाय म्हणून बहुमूल्य असाच आहे.
कै. डॉ. श्रीकांत जिचकारांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत शास्त्रोक्त विवेचनाद्वारेव समाजाप्रतीच्या तळमळीने हा उपाय व्याख्यानांद्वारे महाराष्ट्र व सर्व देशात आणि परदेशात पोहोचवला.
डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी डॉ. जिचकारांनी सुरू केलेले समाजकार्य सुरू ठेऊन हाज्ञानदीप व्याख्याने व पुस्तकांच्या रूपाने सर्व भारतीयांसमोर आणला आहे
त्यांनी २०१३ मध्ये स्वतःवर प्रयोग करून परिणाम पडताळल्यानंतरच या आहारपद्धतिबद्दल लोकप्रबोधन सुरू केले.
आता ही चळवळ ‘स्थूलत्व व मधुमेहमुक्त भारत’ या अभियानाच्या रूपाने अग्रेसर होत आहे.
लोकांना भारतीय अन्न व आहारपद्धती बद्दल प्रबोधन ,चयापचय/metabolism /आहारातील कॅलरिजची माहिती/ वजन न वाढू देता परिपूर्ण आहार कसा घ्यावा या बद्दल माहिती देतील
लठ्ठपणा कमी करण्यासाठी सुचवलेला हा उपाय हा साधा सोपा तर आहेच, पण बिनखर्ची आहे. महत्वाचे म्हणजे कोणीही व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर हा उपाय अंगिकारू शकतो.