बेळगाव शहरात आज दुपार पासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाऊस आला आणि सगळीकडे गारवा निर्माण झाला आहे. यावर्षी मे महिन्यात एक दोन दिवस फरकाने पाऊस येत आहे, यामुळे उकाडा कमी होऊन शांतता मिळत आहे.
यंदा हवामान खात्याने पाऊस समाधानकारक होणार आणि लवकर येणार असे सांगितले आहे. सध्या आडोळ्याचा पाऊस येऊ लागला असून दुपार नंतर तापमान कमी होत आहे.
नागरिकांना यंदा पावसाची तयारी लवकर करावी लागणार आहे. शेतकरिवर्ग अधिक मास असल्याने अजून पेरणी करू शकलेला नाही.काही काळा साठी का असेना मौसम सुहाना झाला आहे.
Trending Now