बेळगावातील ऐतिहासिक शिवजयंती मिरवणूक १९ रोजीच काढण्याचा निर्णय मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. निवडणूक आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आलेली मिरवणूक आता शनिवारी घेण्याचा निर्णय झाला.
प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुस्कर, विकास कलघटगी, सुनील जाधव व इतर उपस्थित होते.
शिवजयंती शांततेने साजरी करून मिरवणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता मिरवणूक ठरलेल्या तारखेप्रमाणे काढून बेळगाव शहराची परंपरा जपण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Trending Now