मी कोणत्याही पदाचा लालची नाही उपमुख्यमंत्री पदाची आशा दाखवली तरी मी भाजपात जाणार नाही अश्या शब्दात ऑपरेशन कमळ ला बळी पडणार नसल्याच माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केलं आहे.
काँग्रेसच्या तत्व आणि सिध्दांताला धरून चालणारा मी माणूस आहे आमिषाला कधीही बळी पडणार नाही असे देखील त्यांनी पुढं नमूद केलं. काँग्रेसला मी हात देणार नाही आणि भाजपसोबत माझे कोणतेही सख्य नाहीस देखील त्यांनी स्पष्ट केलं.