Friday, December 20, 2024

/

सीमाभागात काँग्रेसचे जाळे पसरविण्यात हात अशोक चव्हाण यांचा हात

 belgaum

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बेळगाव भागात चार विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या होत्या, याबद्दल सीमावासीयांनी त्यांचा निषेधही केला होता, चव्हाण यांनी प्रचार केलेले ते चारही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यापैकी दोन मतदारसंघात महाराष्ट्रात सामील होण्याची जनभावना दर्शवण्यासाठी उभे असलेले समितीचे दोन उमेदवारही पडले आहेत.

AShok chavan
विशेष म्हणजे श्री. चव्हाण यांची भाची डॉ. अंजली निंबाळकर या खानापूर मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. कर्नाटक निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ खानापूर, बेळगाव ग्रामिण, कागवाड आणि बाभळेश्वर येथे प्रचारसभा व बैठका घेतल्या होत्या. त्यामध्ये श्री. चव्हाण यांच्या भाची डॉ. अंजली निंबाळकर या खानापूरमधून विजयी झाल्या आहेत. श्री. चव्हाण यांची उमरगा (जि. उस्मानाबाद) येथील मावस बहिण व डॉ. रमेश पाटील मोरे यांची डॉ. अंजली कन्या असून त्या ठिकाणी कॉंग्रेस विजयी झाल्याची माहिती आमदार अमर राजूरकर यांनी दिली.

त्याचबरोबर कॉंग्रेसचे उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर (बेळगाव ग्रामिण), श्रीमंत पाटील (कागवाड) आणि एम. बी. पाटील (बाभळेश्वर) या ठिकाणीही श्री. चव्हाण यांनी सभा घेतल्या होत्या. त्या ठिकाणीही कॉंग्रेस विजयी झाल्याची माहिती जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी दिली. या चार मतदारसंघात प्रचारासाठी नांदेडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांतील कॉंग्रेसचे पदाधिकारी, सदस्य तसेच कार्यकर्तेही आले होते. चारही उमेदवार विजयी झाल्याचे कळाल्यानंतर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला.
महाराष्ट्रात आम्ही सीमावासीयांच्या पाठीशी असल्याचे दाखवून कर्नाटकात आपला पक्ष आणि नात्यातील समिती विरोधी लोकांना निवडून आणायचे हा महाराष्ट्रातील नेत्यांचा दुटप्पी कारभार उघड झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.