निवडणूक निकाल लागल्यावर अनुचित प्रकारांवर प्रतिबंध घालण्यासाठी लागू करण्यात आलेले १४४ कलम आता शुक्रवार पर्यंत वाढवण्यात आले आहे.
यामुळे पुढे ढकलण्यात आलेला शिवजयंती उत्सव आणि मिरवणूकिवर समस्या निर्माण होणार की काय असे वातावरण आहे. निकालानंतर बेळगाव शहरात निर्माण झालेला तणाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी प्रमाणे बेळगाव तसेच उपनगरात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.अनेक मंडळांचे आकर्षक शिवचित्ररथ मिरवणुकीत हिरीरीने भाग घेतात.त्यासंबंधी समग्र चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी बेळगाव व उपनगरातील सर्व शिवजयंती मंडळ,शिवप्रेमी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने बैठकीला हजर राहून चर्चेत भाग घेऊन सहकार्य कराव असे मध्यवर्ती शिवजयंती मंडळ अध्यक्ष श्री दीपक दळवी व कार्यकारी सदस्यांनी आवाहन केले आहे.
ही बैठक गुरुवार दि १७ रोजी सायंकाळी 5.30 वाजता. जत्तिमठ-बेळगाव येथे होणार आहे.
वाढीव १४४ कलम व इतर विषयावर सविस्तर चर्चा करून शिवजयंती मिरवणुकीचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी शिवभक्त नागरिकांतून होत आहे.
Trending Now