विधान सभा निवडणुकीची बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदार संघाची मतमोजणी टिळकवाडी येथील राणी पार्वती देवी कॉलेज मध्ये होणार आहे.
मंगळवारी सकाळी 8 वाजता ही मतमोजणी सुरू करण्यात येणार असून दुपारी 12 पर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे एकूण 18 मतदार संघाच्या ए व्ही एम मशीन 34 खोल्यात बंद करून स्ट्रॉंग रूम बनवण्यात आल्या आहेत.मतमोजणी केंद्राच्या आत आणि बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मतमोजणी केंद्रा बाहेर विजयोत्सव गर्दी होऊ नये म्हणून शहर परिसरात 144 कलम लागू करण्यात आला आहे मंगळवारी सकाळ पासून रात्री पर्यंत मध्य विक्रीस बंदी घालण्यात आली आहे.सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी एस जिया उल्ला आणि निवडणूक निरीक्षकानी मतमोजणी केंद्रास भेट देऊन पाहणी केली बंदोबस्ताचा जायजा घेतला.
सर्व उमेदवारांच्या कौंटिंग एजंट ना पास देण्यात आल्या आहेत मतदान केंद्रा वर एजंट नी कोणत्याही प्रकारची मोबाईल इतर वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे.