कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राज्यात कुठल्या पक्षाचे सरकार येणार याची चर्चा राज्य आणि देशभरात सुरू आहे. या निवडणुकीत जनतेने कुणाला कौल दिला हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. निकाल काय लागणार ही चर्चा जोरात आहे. सीमाभागातील चार मतदारसंघात हीच परिस्थिती आहे.
बेळगाव live ने केलेल्या सर्व्हे नुसार बेळगाव संबंधीत चार मतदारसंघात काय चित्र होईल याचा अंदाज हाती आला आहे.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांची सरशी होणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत त्या पडल्या तरी सतत ५ वर्षे जनतेशी संपर्क ठेऊन त्यांनी केलेली कामे, मागील लोकसभा निवडणुकीत समितीच्या नेत्यांनीच त्यांना केलेली मदत आणि फिक्सिंग करून या निवडणुकीत झालेला अट्टाहास याला कारणीभूत ठरेल.लक्ष्मी या प्रचंड अश्या राक्षसी बहुमतांनी निवडून येतील अशी शक्यता आहे.
खानापूर मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समिती विजयी होणार आहे. सर्व मतदारांकडून मिळालेला पाठींबा पाहता समितीचे विलास बेळगावकर निवडून येण्याच्या मार्गावर आहेत.
बेळगाव उत्तर मध्ये भाजप निवडून येईल असे वातावरण आहे. भाजप चे अनिल बेनके हे विजयाच्या वाटेवर असल्याची चर्चा या मतदारसंघात आहे. काँग्रेस उमेदवाराचा पाडाव करण्यासाठी हिंदू मते एकत्र आल्याने भाजपचा विजय नक्की आहे असे मत आहे.
बेळगाव दक्षिण मतदारसंघात संभ्रम अधिक आहे. वेगवेगळ्या चर्चा आणि अंदाज व्यक्त होत असताना पोलीस इंटलीजन्स विभागाने येथे समितीचा उमेदवार निवडून येईल असा अंदाज व्यक्त केला असून हा अंदाजच खरा ठरण्याची शक्यता जास्त आहे.
निवडणूक म्हणजे हार जीत आलीच. विजयाची माळ कुणाच्या गळ्यात हे उद्या स्पष्ट होईल. प्रत्येक मतदारसंघात एकजण आमदार होणार आणि बाकीचे पडणार आहेत, तेंव्हा जिंकणाऱ्यांनी जनतेच्या सेवेवर भर देऊन काम करावे लागेल. पराभव येणाऱ्यानी नाराज न होता जनतेच्या हाकेला धावून गेल्यास पुढील काळात त्यांना यश मिळू शकते.