मतदान झाले आणि उमेदवारांनी मोकळा श्वास घेतला आहे. मतदार कुणाला किती मते पडतील याचा हिशोब घालत आहेत. सगळीकडे याची चर्चा आहे आणि अंदाज व्यक्त होत आहेत.
आमदार कोण होणार हे मंगळवारी दि १५ रोजी स्पष्ट होणार आहे. आरपीडी कॉलेज येथे निवडणूक प्रक्रियेतील शेवटची कार्यवाही होणार आहे.
मतमोजणीच्या खोलीत यांनाच प्रवेश
१. कौंटिंग सुपरवायजर, असिस्टंट
२.निवडणूक आयोगाची अधिकृतता असलेले अधिकारी
३. निवडणुकीच्या कामावर असलेले सरकारी नोकर
४.उमेदवार आणि त्यांचे एजंट
कौंटिंग हॉल मध्ये जास्तीतजास्त १६ टेबल असतील.या टेबल वर खालील प्राधान्याने बैठक व्यवस्था असणार आहे.
१. राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार
२. राज्यातील पक्षांचे उमेदवार
३. पर राज्यातील पक्षांचे उमेदवार
४. नोंदणी असलेल्या पण मान्यता न मिळालेल्या पक्षांचे उमेदवार
५. अपक्ष उमेदवार
या हॉल मध्ये असलेल्या प्रत्येकाने गुप्तता पाळणे आवश्यक आहे. सर्वप्रथम टपालने आलेल्या मतांची मोजणी होईल. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची मोजणी होईल. एकावेळी एकाच यंत्राची मोजणी होईल.