माजी महापौर,सध्या कार्यरत नगरसेवकात सभागृह चालवण्याची अधिक क्षमता असलेले जेष्ठ नगरसेवक म्हणून सर्वाना परिचित असलेले किरण कृष्णराव सायनाक…. हे बेळगाव दक्षिण मतदार संघातून आमदारकीची निवडणूक लढवत आहेत. सरळ आणि शांत स्वभावाचे असलेले कधी कोणत्या कार्यकर्ता किंवा नेता असुदेत उलट न बोलता प्रेमाने समजावून सांगणारे न जमल्यास गप्प बसणारे किरण सायनाक शांत संयमी आणि सरळ व्यक्तिमत्व आहे.
माजी आमदार कै बळवंतराव सायनाक यांचे पुतण्या आणि नगरपालिकेतील पहिल्या टर्मचे नगरसेवक कै कृष्णराव सायनाक यांचे चिरंजीव किरण सायनाक यांना महाराष्ट्र एकीकरण समितीत घराण्यातून राजकीय वारसा लाभला आहे.जसं बळवंत राव सायनाक हे केवळ मराठीच नाही तर इतर तळागाळातील समाजाशी जुळवून घेऊन पुढे जाते होते त्यांच्याच पावलावर पाउल ठेवत किरण सायनाक देखील बळवंत रावांचा वारसा पुढे नेला आहेत आणि यामुळेच अनगोळ भागातून त्यांना भरघोस असा सराव थरातून पाठिंबा मिळाला आहे.
शनिवारी होणाऱ्या मतदानात किरण सायनाक यांना केवळ मराठाच नाही तर मारवाडी,मुस्लीम,कुरबर,आणि इतर अल्पसंख्यांक समाजांचा देखील भरघोस पाठिंबा मिळत आहे.एकीकरण समितीचा जवळपास ४५ हजारांचा मतदानाचा गट्टा ते पार करतील असच वातावरण आहे. दक्षिणेत उभे असलेल्या विजयाच्या दावेदारात किरण सायनाक हे सर्वात सोफ्त उमेदवार आहेत त्यामुळे त्यांनाच अधिक सहानुभूती आहे.