मतदान अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपले असताना बेळगाव ग्रामीण मतदार संघातील जनतेचा मूड काय आहे असे अनेक विषय घेऊन बेळगाव live आणि टीम ने केलेल्या सर्व्हे केला आहे त्यात अनेक निष्कर्ष समोर आले आहेत.
यावेळेस देखील ग्रामीण मतदात संघात तिरंगी लढत अपेक्षित आहे. पश्चिम भाग आणि पूर्व भाग अश्या दोन्ही विभागात आघाडी घेतलेल्या उमेदवार जिंकू शकतो असे चित्र आहे.प्रचाराच्या सुरुवाती पासून काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर आणि समितीचे मनोहर किणेकर यांनी प्रचारात आघाडी घेतली होती त्यात शेवटी शेवटी भाजपचे संजय पाटील हळूहळू पुढे येताना दिसत आहेत.
कुक्कर वाटपाचा मुद्दा या निवडणुकीतील गाजलेला मुद्दा ठरला असून कुक्कर वाटपाची दखल पंतप्रधान मोदींनी बेळगावच्या सभेत घेऊन टीका केली होती.
या कुक्कर वाटपानेच लक्ष्मी हेब्बाळकरांचे पारडे जड झाल्याचे दिसत आहे त्याचा प्रभाव विशेषतः महिला मतदारा वर जाणवत आहे.
सर्व्हे नुसार हेब्बाळकर यांनी जरी आघाडी घेतली असली तरी मनोहर किणेकरांचं ट्रॅकटर देखील त्याच वेगानं धावत आहे भाजप तिसऱ्या स्थानावर फेकला गेला असून जेडीएस देखील त्या मागोमाग आहे.दोन्ही मोहन किती मतें घेतात त्यावर देखील बरंच काही अवलंबून आहे.
तिरंगी लढतीत शेवटच्या क्षणी क्रॉस वोटिंग झाल्यास ग्रामीण मध्ये मोठा फेरबदल होऊ शकतो मात्र सद्य स्थितीत समिती विरुद्ध काँग्रेस अशीच लढत आहे.योगय रणनीती आखून शेवटच्या क्षणी कोण बाजी मारणार हे पहावे लागेल.
All people plz vote.use ur right of vote.