बेळगाव दक्षिण मतदारसंघात म ए समितीचे किरण सायनाक आता पूर्णपणे आघाडीवर आहेत. एक प्रबळ उमेदवार म्हणून त्यांची वाटचाल सुरू आहे. मराठी भाषिक मते आणि आमदार संभाजी पाटील यांचा पाठींबा यामुळे सायनाक यांचे पारडे जड झाले आहे. यातच संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढल्याने मतदारांचा जोरदार पाठींबा त्यांना मिळत आहे.
माजी आमदार बळवंतराव सायनाक यांचे किरण सायनाक हे पुतणे आहेत. त्यांचे वारसदार म्हणून ते ओळखले जातात. किरण सायनाक यांना हा वारसाच कामाला येणार आहे.
बळवंतराव सायनाक यांना सिंह सायनाक ही उपाधी होती आणि ते समाजात लोकप्रिय होते. फक्तच मराठी किंवा हिंदू नव्हे तर मुस्लिम आणि मागासवर्गीय जातीत त्यांना एक स्वच्छ नेते म्हणून मान्यता होती. तीन वेळा बेळगाव शहराचे ते आमदार झाले. अनेक वर्षानंतर त्यांचे वारस असलेल्या किरण सायनाक यांना आमदार होण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या रूपाने अनगोळ भागाला उमेदवारी मिळाल्याने अनगोळ चे सुपुत्र म्हणून त्यांना पाठींबा वाढत आहे.
शहर म ए समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या पाठींबा ही सुद्धा किरण सायनाक यांच्यासाठी मोठी शक्ती आहे. किरण ठाकूर यांच्यावर भक्ती असलेला आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे, किरण ठाकूर यांनी दिलेला उमेदवार म्हणून सायनाक यांना मान्यता मिळाली आहे, याचा फायदा घेऊन सायनाक यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.
आमदार संभाजी पाटील यांनी पाठींबा दिल्यामुळे सायनाक यांना बळ मिळाले आहे. आता ठाकूर आणि पाटील या दोन शक्ती सायनाक यांच्या पाठीशी उभ्या राहिल्याने सायनाक यांना भक्कम पाठींबा मिळाला आहे.
सायनाक यांनी नगरसेवक आणि महापौर या कारकिर्दीत मोठी कामे केली आहेत, बेळगाव दक्षिण आणि अनगोळ भागात त्यांचे काम मोठे आहे. यामुळे सर्वभाषिक, सर्व जातीय व सर्व धर्मीय जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे.
Trending Now