बेळगाव उत्तर मतदारसंघात म ए समिती च्या वतीने निवडणूक लढवत असलेले बाळासाहेब काकतकर यांनाही आमदार संभाजी पाटील यांचे बळ मिळाले आहे. बाळासाहेब यांची धास्ती आता उत्तर मधील राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना लागली असून ते मुसंडी मारून पुढे जातील असा विश्वास निर्माण झाला आहे.
उत्तर मतदारसंघात बाळासाहेब आणि संभाजीराव पाटील असे दोन उमेदवार उभे होते. संभाजीराव यांनी मोठे मन दाखवून आपली माघार जाहीर केल्याने बाळासाहेबांचे मनोबल आता वाढले आहे.
वाघ आता बाळासाहेब काकतकर यांच्या प्रचारासाठी फिरणार आहे. यामुळे विरोधक नामोहरम होण्यास वेळ होणार नाही.असे वातावरण निर्माण झाले आहे.
बाळासाहेब काकतकर हे दिवंगत शिवाजीराव काकतकर यांचे चिरंजीव आहेत आणि शहर म ए समिती अध्यक्ष किरण ठाकूर यांचे अनुयायी आहेत. दंगल झाली तेंव्हा तुम्ही कुठे होता या प्रश्नाला आम्ही समितीवाले दंगल करायला सांगत नाही असे उत्तर देऊन ते नेटाने प्रचार करत आहे, त्यांची शक्ती वाढत आहे.आमचं मत मराठी अस्मितेलाच अशी भावना वाढत आहे.
बाळासाहेब यांच्या प्रचारात महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर व युवा मंच चे अध्यक्ष नारायण किटवाडकर यांनी आघाडी घेतली आहे. उत्तर मधील सर्व मराठी नगरसेवकांचा पाठींबा घेतल्यास त्यांचा विजय निश्चित होणार असून त्या नगरसेवकांना ताळ्यावर आणण्यासाठी संभाजी पाटील व किरण ठाकूर यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.