सुट्टीवर आलेला जवान आपल्या आईसह बेळगावकडे जात असताना पाठीमागून टँकरने दिलेल्या धडकेत दोघेही ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी अकराच्या दरम्यान खानापूर रोड वर ग्लोब थिएटर समोर घडली आहे.
परशराम भरमानी तारिहाळकर वय 25, पद्मा भरमानी तारिहाळकर वय 45 दोघेही रा.कर्ले तालुका बेळगावं अशी त्यांची नाव आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परशराम हे आपल्या आईसह दुचाकी वरून कर्ले हुन बेळगावं कडे जात होते त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या टँकरने जोराची धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते उपचारासाठी त्यांना प्रथम सिव्हिल नंतर के एल ई मध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतेवेळी त्यांचा मृत्यू झाला.अपघातात सदर जवानाची एक बाजू निकामी झाली असली तरी त्यानं इस्पितळात तब्बल पाच तास मृत्यूशी झुंज दिली अखेर त्याने अंतिम श्वास घेतला.आपल्या मित्राच्या आणि चुलत बहिणीच्या विवाहासाठी तो केवळ 15 दिवसांपूर्वीच सुट्टीवर आला।होता.
या घटनेने कर्ले गावावर शोककळा पसरली आहे दक्षिण रहदारी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.