बेळगाव दक्षिण मतदारसंघात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची रॅली जरी झाली आणि काँग्रेस पक्षाने कितीही प्रयत्न केला तरी समितीच्या बाईक रॅली मुळे सिंह समिती सायनाक यांचे वारसदार किरण सायनाक यांचे पारडे जड आहे हळूहळू त्यांना प्रतिसाद वाढू लागला आहे.
सायनाक यांची मतदान वाढीकडे वाटचाल करत असलेले उमेदवार अशी लोकप्रियता मिळवत आहेत. मतदारवर्गाचा कौल सायनाक यांच्या बाजूने वळत आहे.
रविवारी भव्य अशी रॅली काढून शहापूर ते येळ्ळूर असा प्रवास सायनाक यांनी केला. हाच प्रवास त्यांना विजयाकडे घेऊन जाणार आहे, असे सामान्य जनता व मतदार बोलत आहेत.
किरण सायनाक यांच्यावर विरोधक वेगवेगळे आरोप करत असताना त्याचा सकारात्मक वापर करून घेऊन सायनाक पुढे पुढे जात आहेत. असंख्य कार्यकर्ते सीमा प्रश्नांसाठी राबलेत ज्यांनी या प्रश्नासाठी बलिदान दिल त्यांच्या कोणत्या घराण्याला आमदारकी दिली गेलेली आहे याचा जनतेनी विचार करावा अशी देखील जोरदार चर्चा होत आहे.
विधान परिषद निवडणूक किंवा राज्य सभा निवडणूक यांच्या सरकारच्या बाजूने मतदान करताना मिळालेली रसद कधी हुतात्म्यांच्या वारसांना दिली गेली का?जे कार्यकर्ते पोलीस केस मध्ये अडकलेत बेकार झालेत त्याचं हित आमदारकी भोगलेल्या उमेदवारांनी पाहिलंय का? हा देखील जनते समोर प्रश्न आहेत.
दक्षिण मतदार संघातला उमेदवार शैक्षणिक दर्जा असलेला आहे का ?त्याला भाषण करता येत का? सभा गृह चालवण्याचा अनुभव आहे का ? त्यामुळे निवडून दिल्यावर विधान सभेत ते काय बोलणार त्यामुळे सद्विवेक बुद्धी वापरून जनतेनी आपला उमेदवार निवडावा अशी देखील चर्चा केली जात आहे.