केवळ श्रीमंत आणि उच्च वर्णीय लोकांची मुलेच इंग्लिश माध्यमाच्या शाळेत यश संपादन करतात ही समज चुकीची ठरवली आहे एका ऑटो चालकाच्या मुलीने… नुकत्याच झालेल्या एस एस एल सी परीक्षेच्या निकालात शिवाजी नगर भागात राहणाऱ्या मेघना पवार या ऑटो चालवणाऱ्या मध्यम वर्गीय कुटुंबातील विध्यार्थिनीने घवघवीत यश सम्पादन केले आहे.
सेंट मेरीज शाळेतील मेघना अनिल पवार हिने ९६ टक्के म्हणजे ६२५ पैकी ६०० गुण मिळवत यश संपादन केले आहे.अनिल पवार हे शिवाजी नगर मध्ये राहतात ते ऑटो चालक असून शाळकरी मुलांची वर्दी देखील करत असतात त्यांचीच मुलगी मेघना हिने दहावीत इतक्या मोठ्या प्रमाणात यश संपादन केल्याने शिवाजी नगर भागात तिचे अभिनंदन केल जात आहे.