राज्यातील एस एस एल सी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून बेळगावच्या सेंट झेव्हियर्स शाळेचा विध्यार्थी मोहम्मद कैफ मुल्ला याने ६२५ पैकी ६२४ अंक (९९.८४ %) मिळवून संपूर्ण कर्नाटक राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. बेळगाव वीर भद्र नगर येथील रहिवासी असून त्याने केवळ सायन्स मध्ये ९९ गुण इतर विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. निकाल समजताच मोहम्मद कैफच्या आई वडिलांनी त्याचे पेढा भरवून अभिनंदन केल.
बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याने राज्यात पहिल्या दहा जिल्ह्यात क्रमांक मिळवला असून चिकोडी शैक्षणिक जिल्हा तिसरा आला आहे. गेल्या वर्षी तब्बल २५ व्या स्थानी असलेला बेळगाव जिल्हा यावेळी सहाव्या क्रमांकावर झेप मारली आहे.
99.84% मार्क घेऊन राज्यात 2रा क्रमांक असे नेत्रदिपक यश मिळवणारा बहुधा हा बेळगावातील पहिलाच विद्यार्थी असावा । मोहम्मद कैफचे ह्या उत्तुंग यशाबद्दल अभिनंदन व पुढील उज्वल यशासाठी शुभेच्छा ।