बेळगाव उत्तर मतदारसंघात कितीही धार्मिक भावना असल्या तरी मना मनात समितीचेच वातावरण आहे. फलक आणि पत्रके काढली तरी अजून भाजप बॅकफूटवर आहे, याचा फायदा घेऊन समितीचे उमेदवार विजयाकडे वाटचाल करत आहेत.
लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व मिळाले नसल्याने हा समाज नाराज झाला आहे. या समाजाच्या मतांची भर समितीच्या विजयाची वाटचाल सोपी करणार आहे. समितीच्या खात्यातील मराठी मते कमी झाली नाहीत यात मुस्लिम आणि इतर समाजाची मते वाढून समितीचे संख्याबळ वाढत आहे. याचा अंदाज उघड येत नसेल पण आतून समिती भक्कम होत आहे.
आमदार संभाजी पाटील यांची भूमिकाही या मतदारसंघातील समितीच्या विजयासाठी पोषक ठरणार असून ती भूमिका लवकर जाहीर होणार आहे.
उत्तर भागात जैन आणि लिंगायत मते काँग्रेस कडे आहेत भाजप उमेदवारांची भिस्त फक्त मराठा मतदारांवर आहे असे चित्र निर्माण झालं असताना समितीचा पारंपरिक मतदार विचार करू लागला आहे तो बाहेरून जरी दाखवत नसला तरी मतदान भाषेलाच करणार अस्मितेलाच करणार ही भावना वाढू लागली आहे.