माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी समितील दुही मिटवण्याचे प्रयत्न चालवले असताना दुसरीकडे शिव सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील महारष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटातील नेत्यांना एकत्रित येण्याच आवाहन केल आहे.
नाशिक येथे उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते. कर्नाटक विधान सभा निवडणुकीच्या बाबत समितील बेकी बद्दल पत्रकारांनी विचारले असता ते बोलत होते. समितीच्या दोन्ही नेत्यांना एकत्र येण्याच आवाहन आम्ही केल असून लवकरच ते एकत्र येतील यावेळी देखील समितीचे आमदार कर्नाटक विधानसभेत दिमाखात प्रवेश करतील असे देखील ठाकरे म्हणाले.
सीमा भागा व्यतिरिक्त कर्नाटकात शिव सेना निवडणूक लढवत आहे हे आधीच स्पष्ट केले आहे असेही त्यांनी पुढे नमूद केल.