बेळगाव दक्षिण मतदार संघ हा पारंपारिक कॉंग्रेसचा गड नसला तरी त्या पक्षाचे उमेदवार एम डी लक्ष्मी नारायण यांना देखील भरपूर सहानुभूती मिळत आहे त्यांच्या पाठीशी हळू हळू विणकर समाज एकवटत असताना दिसत आहे.
दक्षिण मतदार संघातील एकूण मतांपैकी जवळपास ४० हजार विणकर मते आहेत ती वोट बँक कब्जा करण्यासाठीच कॉंग्रेसने उपरा का असेना विधान परिषद सदस्य एम डी लक्ष्मी नारायण यांना रिंगणात उतरवल आहे. गेले दोन दिवसा पासून विणकर समाजाचे मठाधीश प्रमुख स्वामीजी दयानंद पुरी यांनी संपूर्ण समाजाला एम डी यांनाच साथ ध्या असे आवाहन केल आहे याशिवाय कुरवीनशेट्टी समाजाचे स्वामीजी हुबळीकर यांनी देखील कॉंग्रेस च्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले आहे.
लक्ष्मी नारायण गेल्या एक वर्षा पासून दक्षिण मतदार संघात कार्य करत असून अनेक छोट्या छोट्या समाजाना राज्य सरकारच्या माध्यमातून मदत केली आहे तळागाळातील समाज बांधवाना संपर्कात आहेत म्हणून मागील २००८ आणि २०१३ विधान सभा निवडणुकीतील दक्षिण मतदार संघातील कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या पेक्षा ते अधिक प्रबळ ठरत आहेत.
लक्ष्मी नारायण यांनी आपला प्रचार अगदी कासवाच्या गतीने सुरु केला असून हळूहळू ते आपली वोट बँक मजबूत करताना दिसत आहेत. समितीच्या दोन ,कॉंग्रेस आणि भाजपच्या उमेदवारा पेक्षा एम डी यांच्याकडे सहानभूती त्यांच्याकडे सहानभूती वळत आहे हे देखील स्पष्ट होत आहे.