केवळ सहा दिवसावर मतदान येऊन ठेपल असताना महाराष्ट्र एकीकरण समितीमधील दुहीची तिढा सुटलेला नाही.
शनिवारी दुपारी वडगांव जुने बेळगाव आणि भारतनगर येथील कार्यकर्त्यांनी दबाव तयार करून शहर समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर आणि मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी दोघेही नेते बैठकीस हजर राहिले दोघांनीही उमेदवार निवड प्रकिया सांगितली.
मध्यवर्ती समिती चे अध्यक्ष दीपक दळवी यांनी माघार किंवा निर्णय घेण्या बाबत वरिष्ठांना विचारून घेऊ अशी भूमिका मांडली यावेळी काहींनी दोन्ही उमेदवारांना एकत्र बोलवून एकीची प्रक्रिया आणि माघार राबवा अशी मागणी केली.या बैठकीत कोणताच निर्णय होऊ शकला नाही मात्र कार्यकर्ते एकच उमेदवार द्या म्हणून आक्रमक झाले होते.
किरण सायनाक आणि प्रकाश मरगाळे यांना दोघांना आणि दळवी ठाकूर यांच्या समक्ष पुन्हा एकदा शनिवारी सायंकाळी बैठक होणार आहे.