Monday, November 18, 2024

/

मराठा लॉबीचं बनतेय हेब्बाळकरांचे ‘शक्तीस्थान’

 belgaum

Laxmiग्रामीण मतदार संघात समिती व्यतिरिक्त राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार बलाढ्य होण सोपं काम नाही आहे मात्र मराठा समाजाच्या ताकतीवर नेत्यांना सोबत घेऊन काम केल्यास बलाढ्य होऊ शकतो याची आजवर अनेक उदाहरणे आहेत, त्यातच गेल्या काही महिन्यात कुकर वाटप असो किंवा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका असो सर्व गोष्टी राबवलेल्या प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी देखील पाच मराठा नेत्यांना सोबत घेऊन जोरदार आगेकूच केली आहे.

शुक्रवारी सायंकाळी बेनकनहळळी येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सभा पार पडली तालुक्याच्या पश्चिम भागात एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यक्रमास इतकी गर्दी होणे सोपी गोष्ट नव्हती त्यातच पूर्वीचा उचगाव ब्लॉक काँग्रेस आठवण या गर्दीने झाली.खानापुरात ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या सभेस तुरळक गर्दी होती त्या तुलनेत हेब्बाळकरांच्या शुक्रवारच्या सभेची उपस्थिती पाहिली असता काँग्रेस बळकटीची लक्षणं आहेत.

या मतदार संघाच्या २ लाख ३४ हजार मतदारां पैकी जवळपास एक लाख १५ हजार मराठी भाषिक मतदार आहेत त्यामुळे या मतदार संघावर मराठा समाजाचे किती प्राबल्य आहे हे समजून येतेच पूर्व भागात माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई,पश्चिम भागात युवराज कदम, मनोहर बेळगावकर, मारुती डुकरे, एस एम बेळवटकर हे मराठा नेते त्यांच्या साठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत.पश्चिम भागात डुकरे आणि बेळगावकर दोन्ही समितीत कार्यरत घराण्यांना फोडण्यात काँग्रेसला यश मिळालं आहे.

नागेश देसाई हे माजी जिल्हा पंचायत सदस्य आहेत पूर्व भाग सांभाळण्याचे कार्य ते करत आहेत या शिवाय माजी बुडा अध्यक्ष युवराज कदम यांची पश्चिम भागात गेली कित्येक वर्ष निष्ठावंत कॉंग्रेस कार्यकर्ते म्हणून काम केल आहे. माजी तालुका पंचायत सदस्य मनोहर बेळगावकर बिजगर्णी भाग, किणये भागात मारुती डुकरे तर गेल्या  काही वर्षात दोन्ही समित्यात वावरलेले एस एम बेळवटकर सुळगा देसुर  भागात आघाडीवर आहेत याच पाच नेत्यांच्या जीवावर मराठी वोट बँक कॅपचर करण्याचा हेब्बाळकर यांचा प्रयत्न दिसत आहे. समितीतील दुही अंतर्गत नाराजीचा फायदा घेण्यात काँग्रेस जोरदार प्रयत्न चालवले आहेत.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.