Monday, November 18, 2024

/

अशोक चव्हाण यांच्या समोर घोषणाबाजी

 belgaum

काँग्रेस पक्षाच्या बेळगाव ग्रामीणच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यास बेळगावला आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना समिती कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
शुक्रवारी सायंकाळी बेनकनहळळी येथे चव्हाण यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी चव्हाण यांनी गावच्या वेशीवर असलेल्या शिव पुतळ्यास हार अर्पण केला त्यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत चव्हाण यांना काळी निशाण दाखवत विरोध केला.

Mes

यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून चव्हाण यांना निवेदन सादर केलं त्यावेळी बेळगाव प्रश्ना बद्दल आपण वक्तव्य करणार नसून काँग्रेसच्या प्रचारार्थ बेळगावला आलो असल्याचं स्पष्ट केलं.रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मेअश्या घोषणाबाजी करत सारा परिसर दणाणून सोडला. आहे.बेनकनहल्ली येथील माळा वर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

Mes

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.