नियोजन नसल्याने शुक्रवारी येळ्ळूर येथील कॉंग्रेस पक्षाच्या पदयात्रेत सहभाग दर्शवता आला नाही मात्र शनिवारी सायंकाळी येळ्ळूर येथे पदयात्रा करून कॉंग्रेस उमेदवाराचा प्रचार करू असे असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केल आहे.
बेळगावात मराठी उमेदवाराच्या विरोधात प्रचार करून नये यासाठी एकीकरण समितीने प्रयत्न चालविले असताना अखेर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे बेळगावात दाखल झाले असून येळ्ळूर समितीने आधी सीमा प्रश्नी भूमिका स्पष्ट करा मगच येळ्ळूर मध्ये प्रचाराला या असे आवाहन दिले होते. शुक्रवारी सायंकाळी बेळगाव क्लब रोड येथील कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष ग्रामीण मतदार संघाच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर जिल्हा अध्यश विनय नावलगट्टी आदी उपस्थित होते.
मी कॉंग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहेभाजप विरोधी लढाईत आम्हाला काँग्रेस पक्षाला सरकार बनवावेच लागेल. काँग्रेस शिवाय जनतेसमोर दुसरा मोठा पर्याय नाही. भाजप हटवसाठी काँग्रेसला सत्तेवर आणावे लागेल म्हणून मी कर्नाटकात कॉंग्रेसचा प्रचार करणार आहे अस त्यांनी स्पष्ट केल.
चार वर्षांत आठ कोटी लोकांना रोजगार देण्याचा भाजपचा वादा खोटा ठरला आहे.अजून १० लाख लोकांना पण हे केंद्र सरकार रोजगार देऊ शकलेले नाही. त्यामुळे कर्नाटकात प्रत्येकाने काँग्रेस पक्षाच्या पाठींबा द्यावा असे आवाहन त्यांनी केलकेंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे साखरेचा दर खाली आला, साखर कारखाने अडचणीत आहेत. म्हणून उसाची बिले देशभरात थकीत आहेत. फक्त कर्नाटकात ही समस्या नसून देशभर आहे याला केंद्राचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे अस देखील ते म्हणाले.