कितीही मंडळांच्या फलकांवर पाठींबा मिळत असल्याचा दावा बेळगाव उत्तर मध्ये भाजप करत असले तरी मना मनात समितीच आहे मराठी अस्मिता आहे. बेळगाव live ने सर्व्हे केला आहे. भाजप हिंदुत्वाचे फलक लावत असले तरी यावेळी उत्तर मध्ये सर्वभाषिक मतांच्या जोरावर समितीच निवडून येणार आहे, असे वातावरण आहे. माझं मत सुप्रीम कोर्टाला अस मत प्रवाह तयार होत आहे.
मागील दोन तीन महिने प्रचार करून भाजपने मराठी माणसाची मते वळवण्याचा प्रयत्न केला, काही तरुण सुरवातीच्या टप्प्यात त्यांच्या मागे लागले होते. आत्ताही गल्लीच्या कोपऱ्यावर काही जण फलक लिहीत आहेत, पण मना मनात समिती आहे.
बेळगावचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. हा प्रश्न उत्तर मुळेच अडला आहे. प्रश्न सुटेल तेंव्हा सुटेल पण मराठीचे वर्चस्व दाखवणे गरजेचे आहे. म्हणून मराठी जनता समितीच्या मागे एकवटत आहे. भाजपला खिंडार पडणार हे नक्की झाले आहे.
मराठी मत पाहिजे पण मराठीला सन्मान द्यायला नको हे या पक्षाचे धोरण मराठी जनता ओळखून आहे. मुस्लिम लोक भाजपचे मतदार नव्हेत, लिंगायत माणसावर तिकीट देताना अन्याय झाला आहे, मागासवर्गीय लोकांना प्रतिनिधी नाही, यामुळे हे सगळे लोकही आपला पाठींबा समिती उमेदवाराला देत आहेत.
मागील दोन वेळा झालेला पराभव भरून काढण्यास लोक सज्ज झाले आहेत. मुस्लिम काँग्रेस बद्दल रोष आहे म्हणूनच समितीला मतदान करा ही मानसिकता तयार झाली आहे.
उत्तर मतदारसंघात समिती येणार नाही भाजपला मतदान करा असा समज पसरवण्यात लोक अपयशी ठरले आहेत. येडीयुरप्पा यांच्या मराठी विरोधी भूमिकेने यात भरच टाकली आहे. म्हणून कीती बी फलक लावले तरी समितीच येणार हे नक्की.