तसं पाहिलं तर महाराष्ट्र एकीकरण समितीवर महाराष्ट्रातील सर्व पक्षांचा अधिकार आहे मराठीला मानणारे सर्व पक्ष मिळून म.ए.समिती तयार झाली आहे मात्र सध्या कर्नाटक विधान सभेच्या निवडणुकीत सीमा भागात प्रचाराला भाजप आणि काँग्रेसचे नेते येत आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी एकीकरण समितीच्या पूर्णपणे पाठीशी उभे असून या निवडणुकीत समितीत एकी करण्या पासून निवडून आणण्याचे राजकारण करत आहेत. भाजपने तर कहरच केला आहे कालच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ग्रामीण मतदार संघात कन्नड धारझिन भाजप उमेदवारासाठी एकीकरण समिती विरोधात प्रचार सभा घेतली. गडकरींनी मराठी बाणा दाखवण्याची गरज होती मात्र पक्षाचे राष्ट्रीय धोरण महत्वाचं मानलं.
शुक्रवारी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण हे बेळगावात दाखल झाले आहेत दक्षिण ग्रामीण आणि खानापूर मतदार संघासाठी त्यांनी सभा घेण्याचे नियोजित कार्यक्रम आहेत. दुपारी एक वाजता येळ्ळूर त्यांनी पदयात्रा आयोजित केली होती .2014 मध्ये येळ्ळूर गावच्या वेशीवर असलेला महाराष्ट्र राज्य फलक काढून मराठी भाषकांना अमानुष मारहाण करणाऱ्या कानडी सरकारच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार होते मात्र गर्दी कमी असल्याचं निमित्त करून त्यांनी येळ्ळूर ला येणे टाळले..
आज त्यांच्या सभा खानापूर आणि ग्रामीण मतदार संघात आहेत तिकडे जातील की नाही अजून नक्की नाही भाजपच्या गडकरीं सारख प्रचार करून मराठी मन दुखवण्या पेक्षा येळ्ळूर जाणे टाळून समिती आणि मराठी साठी काँग्रेस भाजप एवढं सक्त नाही दगडा पेक्षा वीट मऊ हेच दाखवून दिलं आहे.